पौड विठ्ठलवाडी येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Updated On:

पौड – पौड विठ्ठलवाडी येथे श्री स्वामी समर्थ मठ याठिकाणी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले सकाळी ७ वाजता स्वामींचा अभिषेक, स्वामीयाग विधी सोहळा, आरती ,महाप्रसाद, स्वामी समर्थ पालखी सोहळा, महा आरती , स्वामी भक्तांसाठी महाप्रसाद व अन्नदान करण्यात आले.
सायंकाळी स्वामींच्या पालखीची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली यावेळी पौड ग्रामस्थ व स्वामी भक्तांनी दर्शनासाठी अलोट अशी गर्दी केली होती. यावेळी स्वामी समर्थ नामाचा नामघोष करण्यात आला.
सोहळ्याला महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात होता. यावेळी मुळशीतील विविध क्षेत्रातील लोकांनी दर्शनासाठी मठावर उपस्थिती लावली होती. यावेळी स्वामी समर्थ सेवा मंडळ यांचा वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.





