Shree Guru Gobind Singh Challenger Trophy : फातिमा इलेव्हन संघाची उपांत्य फेरीत धडक…

Shree Guru Gobind Singh Challenger Trophy football tournament – फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे यांच्या तर्फे व इलाईट स्पोर्ट्स इव्हेंट्स यांच्या संलग्नतेने आयोजित श्री गुरु गोबिंद सिंग चॅलेंजर्स करंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फातिमा इलेव्हन, फलटण एफसी, सीएमएस फाल्कन अ, शिवनेरी एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
खराडी येथील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या हॉटफुट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत शॉन परेरा १५,४९, ५२ मि.) याने केलेल्या तीन गोलाच्या जोरावर फातिमा इलेव्हन संघाने सीएमएस फाल्कन्स ब संघाचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. फलटण एफसी संघाने विशाल एफसी संघाचा ३-१ असा पराभव केला. विजयी संघाकडून प्रतीक कांबळे (२० मि.), मीत गरवालीया (२९ मि.), कृतिक चव्हाण (५० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
अन्य लढतीत सीएमएस फाल्कन्स अ संघाने पोचर्स एफसी संघाचा ४-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. सीएमएस फाल्कन्सकडून फवाद धुंडवरेने (४५,५६ मि.) दोन गोल, तर विकी राजपूत (३८ मि.), अश्र्विन विजयन (४० मि.)यांनी प्रत्येकी एक गोल केला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2024-prize-money-money-rains-on-champion-mumbai-know-how-much-prize-money-was-received/
४० वर्षाखालील गटात आकतसुखी संघाने कल्याण एफसीसंघावर ६-२ असा विजय मिळवला. आकतसुखी संघाकडून श्रीजित आरने (७, १० मि.) दोन गोल, मतीन (२१ मि.), राजीव राज (३४ मि.), दलझाद (३८ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला विजय मिळवून दिला. कल्याण एफसीकडून सुभदीप बासू (११ मि.), मंडोई मुखेडकर (४० मि.) यांनी गोल केले.





