Satara | तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शहाजीराजे महाविद्यालय प्रथम

खटाव, (प्रतिनिधी) – खटाव, ता. खटाव येथे झालेल्या तालुका स्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत येथील शहाजीराजे महाविद्यालयातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
रेहान शेख,शहिद बागवान,सुमित भराडे, प्रथमेश मोहिते, वेदांत पवार, प्रतीक पाटोळे , सुरज माने, झहीर झारी, सिद्धेश लावंड, पार्थ शिंदे, साहिल कुंभार, तुषार शिंदे, सागर शिंदे, ओमकार भिंगारे ,शिवम शिंदे, हरी जाधव या खेळाडूचा संघात सहभाग होता.
खेळाडूंना प्रा.दिलीप बरकडे व प्रा.सुखदेव सजगणे यांचे मार्गदर्शन लाभले. सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धासाठी संघाची निवड झाली आहे.
विजयी खेळाडूंच्या संस्थेचे अध्यक्ष अजितराव पाटील, माजी प्राचार्य संजय पाटील, प्राचार्य अरविंद येलपले, पर्यवेक्षक प्रा. के. बी. जाधव, सर्व पदाधिकारी ,विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.





