Eatha Teaser : प्रेग्नेंट विठाबाईच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचा थरारक अभिनय; अंगावर काटा आणणारा टीझर समोर
Eatha Teaser : टीझरमध्ये विठाबाईंच्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि धाडसी प्रसंग दाखवण्यात आला आहे.

Eatha Teaser : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासावर आधारित नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘छावा’नंतर आता ते ‘ईठा’ (Eatha ) या बायोपिकमधून तमाशा क्षेत्रातील दिग्गज कलाकार विठाबाई नारायणगावकर यांची जीवनकथा रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत.
या चित्रपटात विठाबाई यांच्या व्यक्तिरेखेत बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. तिच्यासोबत अभिनेता रणदीप हुडा देखील देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा पहिला टीझर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांना श्रद्धाच्या लावणी नृत्यांगनेच्या भूमिकेतील दमदार झलक पाहायला मिळाली आहे. (Eatha Teaser)
टीझरमध्ये विठाबाईंच्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि धाडसी प्रसंग दाखवण्यात आला आहे. गरोदर असतानाही त्या रंगमंचावर आपली कला सादर करत राहतात. कार्यक्रमादरम्यान प्रसूतीची वेळ आल्यावरही त्या कार्यक्रम थांबवत नाहीत आणि मंचामागे जाऊन प्रसूती पूर्ण करतात, असा अंगावर काटा आणणारा प्रसंग टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे.
Don’t know about Alia Bhatt’s #Alpha ,
but one thing is clear—
Shraddha Kapoor’s #Eetha is already creating serious buzz among cinema lovers. pic.twitter.com/sbDJUeGXP6
— Screen & State (@screen_state) June 19, 2026
या चित्रपटात महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जपणाऱ्या लावणीला केंद्रित केले आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. खरंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी काहीतरी वेगळे करण्याच्या तयारीत असते. तिने आपल्या विविधांगी भूमिकेतून याबाबतची झलक दाखवून दिली आहे. आता ती ईठा या चित्रपटात गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे श्रद्धाच्या चाहत्यांना देखील या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे. (Eatha Teaser)
हा टीझर इंटरनेटवर प्रदर्शित करण्यात आला नसून 19 जून रोजी चित्रपटगृहात कॅाकटेल 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाच्या अगोदर ‘ईठा’चा टीझर दाखवण्यात आला आहे. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘ईठा’ हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Eatha Teaser)
हेही वाचा : TMKOC Baagha Video: सर्वांना हसवणारा ‘बाघा’ शुटींगदरम्यान ढसाढसा रडला; नेमकं काय झालं?





