TMKOC Baagha Video: सर्वांना हसवणारा ‘बाघा’ शुटींगदरम्यान ढसाढसा रडला; नेमकं काय झालं?
TMKOC Baagha Video : बाघा उठतो आणि असित मोदींना मिठी मारतो

TMKOC Baagha Video: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. यातील ‘बाघा’ची भूमिका अभिनेता तन्मय वेकारिया याने साकारली आहे.
त्याची चालण्याची, हसण्याची स्टाईल एकदम वेगळी आणि भन्नाट आहे. इतरांना हसावणारा बाघा मात्र सेटवर शुटींगदरम्यान रडताना पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओत तारक मेहतामधील जेठालालच्या दुकानाचा सेट दिसत आहे. जिथं बाघा एका खुर्चीत बसलेला दिसत आहे. तो खूप शांत बसला असून भावुक झालेला दिसतो. बाघाला असं अचानक इमोशनल झालेलं पाहून असित मोदी त्याला काय झालं असं विचारतात.
तेव्हा बाघा उठतो आणि तो असित मोदींना मिठी मारतो. असित मोदींना तो काहीतरी सांगतोय आणि असित मोदीही शांतपणे ऐकून घेत त्याची समजूत घालताना दिसतात.
View this post on Instagram
तन्मयने स्वत: हा व्हिडीओ त्याच्या ओरिजनल ऑडिओसह तो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. ज्यात या दोघांमधील संवाद ऐकू येतो. तन्मय सांगतो, की माझ्या आईला जाऊन आज 8 महिने झाले आहेत.
ती तारक मेहता हा शो आवडीने दररोज न विसरता पाहायची. आज माझा या शोमधील सगळ्यात बेस्ट सीन होता. तिने पाहिला असता तर ती खूप आनंदी झाली असती. पण आज ती तो पाहायला नाही. TMKOC Baagha Video
बाघा आणि बावरी यांचा हा सीन आहे. ज्यात बाघा बावरीला गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकानात एक सरप्राइझ देतो. हा सीन करताना तन्मयला त्याच्या आईची आठवण येते आणि तो रडू लागला. त्यावेळी शूटही काही वेळ थांबवावं लागलं.
दरम्यान, या मालिकेत जेठालालच्या गडा इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील एक कर्मचारी म्हणून बाघाचा अभिनय आणि ‘बावरी’सोबतची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र बाघाचा हा व्हिडिओ पाहून त्याचे फॅन्सही इमोशनल झाले आहेत. TMKOC Baagha Video
हेही वाचा :





