Shraddha Kapoor: रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत पुन्हा दिसली श्रद्धा कपूर; स्ट्रीट फूड खाऊ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

Shraddha Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात श्रद्धा स्वतःच्या हाताने राहुलला स्ट्रीट फूड खाऊ घालताना दिसते.
व्हायरल व्हिडिओत दिसली क्यूट केमिस्ट्री
मुंबईतील एका नवीन रेस्टॉरंटच्या बाहेर श्रद्धा आणि राहुल एकत्र दिसले. व्हिडिओमध्ये श्रद्धा अतिशय हसतमुख दिसते आणि राहुलला प्रेमाने मिठाई खाऊ घालताना तिची क्यूट स्माईल सर्वांना भुरळ घालत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि श्रद्धाच्या फॅन्सनी कमेंट बॉक्समध्ये इमोजींचा पाऊस पाडला.
View this post on Instagram
श्रद्धा राहुलच्या पुढच्या चित्रपटात काम करणार?
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, श्रद्धाने नुकतेच सांगितले की तिच्या नवीन चित्रपटाची शूटिंग तिने पूर्ण केली आहे. तिने अधिक तपशील उघड केले नाहीत, पण लवकरच घोषणा होणार असल्याचे सांगितले.
तसेच चर्चा आहे की राहुल मोदीच्या पुढील चित्रपटात श्रद्धा मुख्य भूमिकेत दिसू शकते. ही फिल्म स्टार्टअप आणि हसल कल्चरवर आधारित असेल आणि श्रद्धाचा रोल पूर्णपणे वेगळा व आव्हानात्मक असेल.
श्रद्धा कपूरचा वर्कफ्रंट
श्रद्धाची आगामी मोठी फिल्म ‘नागिन’ आहे, जी प्रेम आणि बलिदानावर आधारित असेल. निर्माते निखिल द्विवेदी यांनी सांगितले की या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. ही फिल्म 2025 किंवा 2026 मध्ये फ्लोरवर येईल अशी अपेक्षा आहे.
श्रद्धा कपूर शेवटचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘स्त्री 2’ मध्ये राजकुमार रावसोबत दिसली होती.





