श्रद्धा कपूर – आदित्य रॉय कपूरला मारली मिठी’ चाहते म्हणाले,”आशिकी 2’चा तो क्षण पुन्हा…”

अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी, अभिनेत्रीने तिचा सहकलाकार आणि माजी प्रियकर आदित्य कपूरला भेटली. कार्यक्रमात एकमेकांना पाहताच दोघांनी एकमेकांना मिठी मारली, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी ‘आशिकी 2’ चित्रपटात एकत्र काम केले होते. अशात जेव्हा दोघे एका कार्यक्रमात भेटले तेव्हा पाऊस पडत होता आणि जेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली तेव्हा त्यांच्यावर छत्री होती. हा क्षण त्याच्या ‘आशिकी 2’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ गाण्यासारखाच होता. हा क्षण पाहून चाहते खूप आनंदी झाले.
व्हिडिओ पाहिल्यानंतरचाहते प्रतिक्रिया देत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर एका जागी उभी असल्याचे दिसत आहे आणि त्यानंतर मागे उभा असलेला आदित्य रॉय कपूर येऊन तिला भेटतो. आदित्यला पाहून श्रद्धा कपूरने त्याला मिठी मारली. आता चाहते या क्षणावर उग्र प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले- ‘पाऊस आणि मग दोघे एकत्र.’ असं म्हणत या दोघांनी पुन्हा ऑनस्क्रीन काम करण्याची चाहते इच्छा व्यक्त करत आहे.
लूकबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा कपूर काळ्या रंगाची साडी नेसलेली दिसली. तर काळ्या ब्लेझर सूटमध्ये आदित्य रॉय कपूर खूपच डॅशिंग दिसत होता.
दरम्यान, श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी 2013 मध्ये आलेल्या ‘आशिकी 2’ चित्रपटात काम केले होते आणि तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, दोघांनीही या अफवांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. 2017 मध्ये आलेल्या ‘ओके जानू’ चित्रपटातही श्रद्धा आणि आदित्य एकत्र दिसले होते.





