Devendra Fadnavis : भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात भाषण केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात केलेल्या कामामुळे देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर आपले मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत. अस ते म्हणाले. तसेच दसरा मेळाव्यातुन त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरेंना टोला लगाविला. कालच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणार प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेल. उद्धव ठाकरेंनी माझे 1 हजार रुपये वाचवले. मी आवाहन केले होते, की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचे भाषण ऐकले नाही.
परंतु मी पत्रकारांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केले नाही. त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एखादा व्यक्ती निराश झाला तर तो अदवातदवा बोलत असतो. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते. अस म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टोला लगावला.
तसेच त्यांनी राजकारण बाजूला ठेवले तर आम्हीही ठेवणार. त्यांनी अतिवृष्टी बाबत राजकारण सुरू केले. तेही सत्तेत होते. सत्तेत असताना जेव्हा जेव्हा आपत्ती आली तेव्हा त्यांनी काय केले हे पाहावे. अशा प्रकारच्या आपत्तीत विरोधी पक्षाने काय केले, काय निर्णय घेतला. काय जीआर केला याचा त्यांनी आरसा पाहावा, असेही फडणवीसांनी म्हटले.





