कुत्र्याच्या भुंकण्यावरून भांडण होताच केला गोळीबार ! प्रेग्नंट महिलेसह सहा जण जखमी; दोन ठार VIDEO

नवी दिल्ली – कुत्र्याच्या भांडणातून माणसांमध्ये झालेल्या वादातून एकाने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाल्याचा प्रकार मध्यप्रदेशात घडला आहे. बॅंक सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या डबल बॅरल बंदुकीतून गोळीबार केल्याने एक व्यक्ती आणि त्याचा मेव्हणा ठार झाला आणि एका गर्भवती महिलेसह सहा जण जखमी झाले. मध्य प्रदेशातील इंदूर शहरात हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली, त्यानंतर आरोपी सुरक्षा रक्षक, त्याचा मुलगा आणि पुतण्याला अटक करण्यात आली, आहे. हा आरोपी “बॅंक ऑफ बडोदाच्या स्थानिक शाखेत सुरक्षा रक्षक म्हणून तैनातीस आहे. त्याचे नाव राजपाल सिंग राजावत असे आहे.
क्षुल्लक कारणावरून राजपालने केलेल्या गोळीबारात राहुल वर्मा (28) आणि त्याचा मेहुणा विमल (35) यांचा मृत्यू झाला, तर या घटनेत जखमी झालेल्या इतर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
VIDEO | Two people were killed and six others injured after a man, identified as a security guard Rajpal Rajawat, fired shots on neighbours following an argument over pet dogs in MP’s Indore.
(Note: Audio muted due to abusive content)
(Source: Third Party) pic.twitter.com/jw8Btu9GVN
— Press Trust of India (@PTI_News) August 18, 2023
राजावत आपल्या पाळीव कुत्र्याला कृष्णबाग कॉलनीत फिरायला घेऊन गेला होता. त्यावेळी त्यांच्या कुत्र्याने शेजारच्या पाळीव कुत्र्यावर भुंकायला सुरुवात केली. यावरून राजावत आणि विमल यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला, त्यातून हा भयानक प्रकार घडला.





