Solapur News : सोलापूरात शॉर्ट सर्किटने २ एकर ऊस जळून खाक
Solapur News : यंदा चार महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने सोलापूर जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Solapur News : यंदा पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. अशातच विहिरीतील जेमतेम पाण्यावर ८ ते १० महिने जगवलेला ऊस विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळून गेल्याने मंद्रूपच्या शेतकऱ्यावर दुबार संकट कोसळले आहे. (Solapur News)
मंद्रूप येथील शेतकरी भगवान गौरीशंकर सुतार यांचे मंद्रूप- कुरघोट रस्त्यावर शेत आहे. बुधवारी सकाळी विजेच्या कमी- अधिक दाबामुळे शॉर्टसर्किट झाले आणि ठिणगी थेट ऊसात पडली. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. चार एकर ऊसापैकी दोन एकर ऊस शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत जळून खाक झाला. (Solapur News)
परिसरातील शेतकऱ्यांनी विहीर आणि बोअरमधील पाणी आणून कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे उर्वरित दोन एकर ऊस बचावला. तोडणीला अवघे १५ ते २० दिवस बाकी असताना हा प्रकार घडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. (Solapur News)
वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे हे घडल्याचा आरोप करत कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी रावसाहेब कोकरे यांनी करून शासनाला अहवाल सादर केला आहे. (Solapur News)





