नेमबाजीत पुन्हा होणार कमाल; भारताला आणखी दोन पदकाची आशा; कसे असणार आजचे वेळापत्रक ?

Paris Olympics 2024| भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. आता 29 जुलै रोजी पदकांचा सामनाही होणार आहे. ज्यात भारत आज आणखी दोन पदके जिंकण्याची शक्यता आहे.
आज रमिता जिंदाल 10 मीटर एअर रायफल महिलांच्या अंतिम फेरीत आणि अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफल पुरुषांच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. 29 जुलै रोजी दुपारी 12.45 वाजता भारतीय खेळाडूंची नेमबाजी स्पर्धा होणार आहे. या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत दोन भारतीय संघ सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये पहिल्या संघात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग तर दुसऱ्या संघात अर्जुन सिंग चीमा आणि रिदम संगवान आहेत. याशिवाय, ट्रॅप स्पर्धा दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होईल, ज्याच्या पात्रता सामन्यात भारताचा पृथ्वीराज तोंडैमन खेळताना दिसणार आहे.
रमिताला पदक मिळू शकते
10 मीटर एअर रायफलचा अंतिम सामना सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून होणार आहे, ज्यामध्ये रमिता जिंदाल पदकासाठी आव्हान देईल. रविवारी खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीत 20 वर्षीय रमिता 631.5 गुणांसह पात्र ठरली. ती पाचव्या स्थानावर राहिली. तिने सहा सीरीजमध्ये 104.3, 106.0, 104.9, 105.3, 105.3, 105.7 असे गुण मिळवले.
भारतीय नेमबाज अर्जुन बबुता
भारतीय नेमबाज अर्जुन बबुता दुपारी 3.30 वाजता पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. अशा स्थितीत तोही भारताला पदक मिळवून देऊ शकतो. रविवारी झालेल्या सामन्यात 630.1 गुणांसह 60 शॉट्सच्या पात्रता मालिकेत तो 7 व्या स्थानावर होता.
आजचे वेळापत्रक जाणून घ्या..
तिरंदाजी – पुरुष टीम उपांत्यपूर्व फेरी: तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव – संध्याकाळी ६.३०
बॅडमिंटन- पुरुष दुहेरी : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल (जर्मनी – १२-२)
महिला दुहेरी : अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो वि. नामी मत्सुयामा आणि चिहारू शिदा (जपान) – दुपारी १२.५०
पुरुष एकेरी (ग्रुप स्टेज): लक्ष्य सेन विरुद्ध ज्युलियन कॅरेगी (बेल्जियम) सायंकाळी ५.३० वाजता
नेमबाजी – १० मीटर एअर पिस्टल मिश्र टीम क्वालिफिकेशन: मनू भाकर आणि सरबज्योत सिंह, रिदम सांगवान आणि अर्जुन सिंह चीमा – दुपारी १२.४५
– पुरुष ट्रॅप क्वालिफिकेशन : पृथ्वीराज तोंडैमन – दुपारी १.००
– १० मीटर एअर रायफल महिला अंतिम : रमिता : दुपारी १.००
– १० मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी: अर्जुन बबुता – दुपारी ३.३०
हॉकी – पुरुष पूल B सामना: भारत विरुद्ध अर्जेंटिना – सायंकाळी ४.१५
टेबल टेनिस – महिला एकेरी ( राउंड ऑफ ३२): श्रीजा अकुला विरुद्ध जियान झेंग (सिंगापूर) – रात्री ११.३०
मनू भाकरची दमदार कामगिरी
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत मनूने सुरुवातीपासून अखेरपर्यंत तिसरे स्थान कायम राखले. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदके दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली.
हेही वाचा:
वरळीत ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती; बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू





