Paris Olympics 2024 (Men’s 10m air pistol) : भारताच्या पदरी पुन्हा निराशा, सरबजोत आणि चीमा पात्रता फेरीतून बाहेर…

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतीय खेळाडूंनी आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे. नेमबाजी व्यतिरिक्त रोइंग, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये भारत आज सहभागी होताना दिसणार आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा शुक्रवारी शुभारंभ झाला आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी आज भारतीय नेमबाजांकडून पदकाची अपेक्षा होती. पण त्यांनी निराश केलं.
Shooting: Indian Shooters Sarabjot Singh & Arjun Singh Cheema failed to qualify for the Men’s 10m air pistol qualification event.
Sarabjot Singh – 9th position with 577 points.
Arjun Singh Cheema – 18th position with 574 points.#Paris2024 #Cheer4Bharat #Olympics #Shooting pic.twitter.com/CMKEZs6YbN— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 27, 2024
10 मीटर एयर रायफल मिक्स्ड टीम इवेंटमध्ये भारताच्या दोन्ही जोड्या फायनलसाठी क्वालिफाय करु शकल्या नाहीत. त्यानंतर आता नेमबाजीतून भारतासाठी आणखी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ज्यात सरबज्योत सिंग आणि अर्जुन चीमा 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता फेरीतून बाहेर झाले आहेत. ते 10 मीटर पिस्तुल प्रकारातील अंतिम फेरीत स्थान मिळवू शकले नाहीत.
सरबज्योत सिंग (Sarabjot Singh) 577 गुणांसह नवव्या तर अर्जुन सिंग चीमा(Arjun Singh Cheema)574 गुणांसह अठराव्या स्थानावर राहिला आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोघांना टॉप-8मध्ये स्थान मिळवणे गरजेचे होते, पण त्यांना अपयश आले आहे. यासह त्यांचे पदकाचे स्वप्न भंग झाले आहे.





