स्वत:चेच हेलिकॉप्टर पाडणे ही हवाई दलाची मोठी चूक

हवाई दल प्रमुख राकेश कुमारसिंग भदौरिया यांची कबुली
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने 27 फेब्रुवारी रोजी स्वत:चेच एमआय 17 हेलिकॉप्टर पाडणे ही मोठी चूक होती, अशी कबुली हवाई दल प्रमुख राकेश कुमारसिंग भदौरिया यांनी आज येथे दिली. यातील दोषींवर शिक्षात्मक कारवाई कलरण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
आपलेच हेलिकॉप्टर पाडणे ही आमची मोठी चुक होती. या प्रकरणी मेमलेल्या कोर्ट ऑफ एन्क्वायरीने आपला अहवाल सादर केला आहे. दोन दोषी अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे, असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख भदारिया यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, बालाकोट हवाई हल्ल्यासह अनेक मैलाचे दगड पार केले. मागील यशात रममाण न होता कोणत्याही आव्हानांना सामोरे जायला हवाई दल सज्ज आहे.
27 फेब्रुवारी जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने हेलिकॉप्टर पाडण्यात आले होते. त्यात हवाई दलाचे सहा कर्मचारी आणि एक नागरिक मरण पावला होता. हेलिकॉप्टरमधील शत्रू किंवा मित्र ओळखणारी यंत्रणा बंद होती. त्यामुळे जमीनीवर काम करणारे कर्मचारी आणि हेलिकॉप्टरमधलि कर्मचारी यांच्यात संवादचा अभाव निर्माण झाला. त्यात प्रमाण कार्यपध्दतीचे उल्लंघन झाले., असे ते म्हणाले.
राफेल विमाने एस 400 हवार्6 संरक्षण यंत्रणा ताफ्यात आल्यानंतर हवाई दलाच्या माऱ्या क्षमतेत प्रचंड वाढ होणार आहे.





