ISSF President’s Cup : नेमबाजीत भारताचे यश
Updated On:

नवी दिल्ली – भारताचे अव्वल नेमबाज सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी आयएसएसएफ प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुक्रमे रजत आणि ब्रॉंझपदक पटकावले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत सौरभने 24 गुणांसह दुसरा, तर अभिषेकने 21 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. जर्मनीच्या ख्रिस्तियन रित्झने 34 गुणांची कमाई करताना सुवर्णपदक पटकावले.
यंदापासून प्रेसिडेंट्स चषक स्पर्धेमध्ये गुण पद्धतीत बदल करण्यात आला असून उपांत्य आणि अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नेमबाजाला चार गुण, दुसऱ्या क्रमांकावरील नेमबाजाला तीन गुण, तिसऱ्या क्रमांकावरील नेमबाजाला दोन गुण आणि अखेरच्या नेमबाजाला एक गुण दिला जातो. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत.





