Raj Kiran : रुपेरी पडद्यावर चमकला, पण वास्तवात झाला बेपत्ता; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचं गूढ अजूनही कायम
Raj Kiran : अभिनेत्याला बेपत्ता होऊन अनेक वर्षांचा काळ लोटला असून या दरम्यान अनेक गोष्टी बदलेल्या आहेत.

Raj Kiran : बॅालिवूडमधील एकेकाळचे लोकप्रिय अभिनेते राज किरण (Raj Kiran ) गेल्या दोन दशकांपासून बेपत्ता आहेत. जवळपास १०० हून अधिक सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. आपल्या अभिनयाची छाप सोडणारे राज किरण २००३ पासून बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र अद्यापही ते नेमके कुठे आहेत याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्याचं गूढं अनेक वर्षानंतर आजही कायम आहे.
या वर्षामध्ये राज किरण कुठे आहेत, याबाबत अनेक दावे समोर आले आहेत. तरी अजूनही ते नेमके कुठे आहेत याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्याला बेपत्ता होऊन अनेक वर्षांचा काळ लोटला असून या दरम्यान अनेक गोष्टी बदलेल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. (Raj Kiran)
त्यांच्या मुली ऋषिका महतानी आणि मन्नत महतानी या दोघीही आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत. सोशल मीडियावर अनेकदा वडिलांच्या आठवणी दोघेही शेअर करताना दिसतात. राज किरण यांची मोठी मुलगी ऋषिका महतानी हिने दागिन्यांच्या व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे पती रवी हे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर असून त्यांच्या डिझाइन्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. अनेक नामांकित कलाकारांनी त्यांनी तयार केलेले दागिने परिधान केले आहेत.
पत्नीने केला पुनर्विवाह (Raj Kiran)
ऋषिका आणि रवी यांच्या लग्नाला १२ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. आपल्या आयुष्यात पुढे जात असतानाही ऋषिका सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे वडिलांची आठवण काढत असते. या दाम्पत्याला नुकतेच कन्यारत्न झाले आहे. राज किरण यांची धाकटी मुलगी मन्नत हिनेही २०२० मध्ये लग्न केले. दरम्यान, राज किरण यांच्या पत्नीनेही अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्विवाह केला.
‘कागज की नाव’ सिनेमातून बॅालिवूडमध्ये एन्ट्री (Raj Kiran)
Raj Kiran : रुपेरी पडद्यावर चमकला, पण वास्तवात झाला बेपत्ता; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचं गूढ अजूनही कायम
राज किरण यांनी १९७५ मध्ये ‘कागज की नाव’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘कर्ज’, ‘अर्थ’ यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र १९९० च्या दशकात त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स कमी होऊ लागल्या आणि ते हळूहळू प्रसिद्धीपासून दूर गेले. राज किरण यांच्या गायब होण्याबाबत अनेक दावे समोर आले आहेत.
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मोठा दावा
काही वृत्तांनुसार, सत्य साई बाबांच्या पुट्टपर्थी आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांना बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आल्याचेही सांगितले जाते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी काही वर्षांपूर्वी दावा केला होता की, त्यांनी राज किरण यांना मुंबईतील मसिना रुग्णालयात पाहिले होते, जिथे त्यांच्यावर मानसिक आरोग्याशी संबंधित उपचार सुरू होते.
दुसरीकडे, तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी अमेरिकेतील एका मानसिक आरोग्य संस्थेत राज किरण सापडल्याचे म्हटले होते आणि त्यांना भारतात आणण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. मात्र या सर्व दाव्यांनंतरही राज किरण यांचा नेमका ठावठिकाणा आजही गूढच आहे. पडद्यावर अनेक भूमिका साकारणारा हा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एका मोठ्या रहस्याचा भाग बनला आहे.
Health Tips: दूध कधी प्यावे? सकाळी की रात्री? योग्य वेळ माहिती नसेल तर मिळणार नाही पूर्ण फायदा





