धक्कादायक.! यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बायकोची प्रसूती; बायकोचा झाला मृत्यू

Updated On:
धक्कादायक.! यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बायकोची प्रसूती; बायकोचा झाला मृत्यू

चेन्नई – यूट्युबवर व्हिडिओ पाहून एकाने बायकोची प्रसूती केल्याची घटना तमिळनाडूतून समोर आली आहे. यानंतर या व्यक्तीच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी आता पतीला अटक होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. बाळाची प्रकृती मात्र चांगली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या कृष्णागिरीमध्ये मधेश आणि लोगनयाकी हे दाम्पत्य वास्तव्याला होते. लोगनयाकी ही गर्भवती होती. मधेशने बायकोला रूग्णालयात न नेता घरी स्वतःच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. प्रसुतीसाठी त्याने युट्युबवरील व्हिडिओ बघितले होते.

यानंतर पत्नीला प्रसवकळा सुरू झाल्यावर त्याने तिला रुग्णालयात न नेता स्वतःच तिची प्रसूती केली. मात्र यादरम्यान अती रक्तस्त्राव झाल्याने त्याची पत्नी बेशुद्ध झाली. यानंतर मधेशने तिला रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

नाळ व्यवस्थित कापली नाही
मधेशने प्रसूती कशी करावी याची माहिती युट्युबवरून मिळवली होती. प्रसुतीदरम्यान मधेशच्या बायकोने बाळाला जन्म दिला. मात्र त्याने गर्भनाळ व्यवस्थित कापली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोला खूप जास्त रक्तस्त्राव झाला आणि यामुळे ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 (अनैसर्गिक मृत्यू) अंतर्गत तक्रार दाखल करून घेतली आहे. प्राथमिक तपासात युट्यूब व्हिडिओ पाहून डिलीव्हरी केल्याची माहिती मिळाली आहे. तपासात ही गोष्टी खरी निघाल्यास पती मधेशवर अटकेची कारवाई होईल असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

2026-07-08 19:19:53

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Supreme Court : 'बँक संघटना वकिलांना काळ्या यादीत टाकू शकत नाही' - सर्वोच्च न्यायालय

2026-07-07 19:20:10

Supreme Court : 'बँक संघटना वकिलांना काळ्या यादीत टाकू शकत नाही' - सर्वोच्च न्यायालय

Syria blast : सीरियामधील स्फोटांमध्ये १८ जखमी; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांच्या भेटीदरम्यान झाले स्फोट

2026-07-07 19:04:21

Syria blast : सीरियामधील स्फोटांमध्ये १८ जखमी; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांच्या भेटीदरम्यान झाले स्फोट

Ratnagiri Landslide : रत्नागिरीत दरड कोसळून ५ घरे गाडली; एकाची सुटका, दोघे अडकले

2026-07-07 18:09:34

Ratnagiri Landslide : रत्नागिरीत दरड कोसळून ५ घरे गाडली; एकाची सुटका, दोघे अडकले

Wayanad Landslide : वायनाला मुसळधार पावसामुळे भूस्खलन; कल्लाडी बोगदा प्रकल्प परिसरात दुर्घटना

2026-07-07 15:56:06

Wayanad Landslide : वायनाला मुसळधार पावसामुळे भूस्खलन; कल्लाडी बोगदा प्रकल्प परिसरात दुर्घटना