धक्कादायक ! जगात १ कोटींच्या जवळ कोरोनाबाधितांचा आकडा

नवी दिल्ली : जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कारण जगात 90 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील 24 तासात 3338 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर एक लाख तीस हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 90 लाख 45 हजार 457 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 69 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 48 लाख 33 हजार 574 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 426,910 रुग्ण आहेत. तर 13,703 बळी कोरोनामुळे गेले आहेत. सध्या भारतात 175,955 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 237,252 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,356,655 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 122,247 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 1,086,990 कोरोनाबाधित आहेत तर 50,659 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 42,632 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 304,331 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,634 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 238,499 हजार इतका आहे.





