Kaylee Hottle’s death : शॅाकिंग! ज्यांच्यासाठी आशा बनली त्यांनाच पोरकं करुन गेली; अवघ्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीची चटका लावणारी एक्सिट
Kaylee Hottle's death : तिच्या अपघाती मृत्यूमुळे जगभरातील तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Kaylee Hottle’s death : हॉलीवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘गॉडझिला वि. काँग’ आणि ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ या चित्रपटांतील ‘जिया’ या भूमिकेमुळे जगभरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री केली केयली हॉटल हिचे अवघ्या १८ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले.
तिच्या निधनाची अधिकृत माहिती तिचे वडील जोशुआ हॉटल यांनी दिली आहे. केयलीच्या अपघाती निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अपघाती मृत्यूमुळे जगभरातील तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Kaylee Hottle’s death)
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी मेरीलँडमध्ये ती प्रवास करत असलेल्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. या अपघाताचा तपास सुरू असून, अतिवेग हे अपघातामागील संभाव्य कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Kaylee Hottle’s death)
केली हॉटलने २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॉडझिला वि. काँग’ या चित्रपटातून ‘जिया’ ही भूमिका साकारत हॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले. त्यानंतर ती ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’मध्येही झळकली. तिच्या पडद्यावरील नैसर्गिक अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. (Kaylee Hottle’s death)
कर्णबधिर कलाकारांना दिली नवी ओळख (Kaylee Hottle’s death)
विशेष म्हणजे जन्मतःच कर्णबधिर असलेल्या केली हॉटलने आपल्या अभिनयातून कर्णबधिर समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. तिचे संपूर्ण कुटुंबही कर्णबधिर असून ती अमेरिकन सांकेतिक भाषा (ASL)ची वापरकर्ती होती. तिच्या कामामुळे मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये कर्णबधिर कलाकारांना नवी ओळख मिळाली. केली हॉटलच्या अकाली निधनामुळे हॉलीवूडसह जगभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.





