Parbhani News : धक्कादायक ! कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू

परभणी : एकीकडे रमजान ईदचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे दुर्दैवी घटनेत एका मुस्लीम कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. रमजान ईद निमित्त साफसफाई करताना लोखंडी कुलरचा शॉक लागून सख्या जावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौर गावात घडली आहे. ईदच्या आधीच शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गौर गावातील नवी आबादी या भागात राहणाऱ्या शेख जहुराबी शेख ईसुब (वय 52) आणि बिस्मिल्लाबी शेख इस्माईल (वय 58) या दोघी सख्या जावा. मात्र, दुर्दैवाने या दोन्ही सख्ख्या जावांचा आज कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
देशभरात पुढील आठवड्यात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे, रमजान ईदनिमित्त घराची साफ-सफाई करत असताना दोन सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.





