धक्कादायक! पोलीस शिपायाचा स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न; वाचवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला लागली गोळी
Updated On:

पुणे – शिवाजीनगर मुख्यालयात एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडली. मात्र, त्याला वाचवायला गेलेल्या शिपायाला ती लागल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे पोलीस पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल बेंडाळे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
माहितीनुसार, ड्युटीवर असताना महिला कर्मचाऱ्याशी वाद झाला. यानंतर मानसिक तणावातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.





