मन हेलावणारी घटना! दोन मुलींसह आईची कोकणकन्या एक्स्प्रेसखाली आत्महत्या
Updated On:

माणगाव – दोन मुलींसह आईने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील लोणेरे येथे घडली. रिना जयमोहन नायर (३६), जिया (१४) आणि लक्ष्मी जय (१२) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव-माणगाव येथे राहणार्या रिना नायर यांनी मडगावहून मुंबईकडे धावणार्या कोकणकन्या एक्स्प्रेसखाली दोन्ही मुलींसह स्वतःला झोकून देत आपल्या जीवनाचा शेवट केला.
एक्स्प्रेसच्या चालकाने या घटनेची माहिती गोरेगाव स्टेशन मास्तरांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या तिघींपैकी रिना आणि लक्ष्मी जय यांचे मृतदेह रूळावर पडलेले आढळून आले, तर आधी न सापडलेल्या जिया हिचा मृतदेह दुपारी १२.३० वाजता रूळापासून काही अंतरावर झुडपात आढळून आला.





