Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी (OSD) असल्याचे भासवून पुणे पोलिसांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. या प्रकरामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी तथाकथित ओएसडीचा भांडफोड केला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित व्यक्तीविरोधात फसवणूक आणि सरकारी अधिकाऱ्याची खोटी ओळख धारण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ही घटना म्हणजे सरकारी यंत्रणेच्या नावाचा गैरवापर करून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस आला. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी अशी करून दिली. त्याने काही प्रकरणांमध्ये पोलिसांवर दबाव टाकण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना संशय कसा आला? संबंधित व्यक्तीच्या बोलण्यात व माहितीमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांना संशय आला. पडताळणी केल्यानंतर तो खोटा अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले. याची पुढील कारवाई पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47,रा.हिंजवडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी (OSD) असल्याचे सांगत पुण्यातील परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या कामकाजासाठी ओएसडी (विशेष कार्यकारी अधिकारी) नियुक्त केले जातात. अनेकदा हे अधिकारी खासगी सचिव म्हणूनही जबाबदाऱ्या सांभाळतात. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अशा अधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याने काहीजण या पदाचा धाक दाखवत शासकीय विभागांमध्ये कामे करून घेत असल्याचेही दिसून येते. हेही वाचा : The Final Question Teaser : संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेत! ‘आखरी सवाल’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज