The Final Question Teaser : संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेत! ‘आखरी सवाल’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज
The Final Question Teaser : आखरी सवाल या सिनेमातून अभिनेता संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

The Final Question Teaser : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्त याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. त्याचं कारण होतं त्याने साऊथच्या एका सिनेमातील अभिनेत्री नोरा फतेहीसोबत केलेला डान्स.
‘केडी: द डेविल या सिनेमातील सरक सरके चुनर तेरी सरके या गाण्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे गाणे यू ट्यूबवरुन हटवण्यात आले. आता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्याच्या आगमी आखरी सवाल या सिनेमामुळे.
या सिनेमाचा टीझर हनुमान जयंतीच्या निमित्ताने रिलीज करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होती.
अखेर आखरी सवाल सिनेमातून संजय दत्त एका दमदार भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमा निर्माते अभिजीत मोहन वरांग यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर लादलेल्या बंदीपासून ते बाबरी मशिदीच्या विध्वंसासंदर्भातील आरोपांपर्यंत ‘आखिरी सवाल’ सिनेमात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जातात. ज्यांची उत्तरे लोक बऱ्याच काळापासून शोधत आहेत.
धाडसी आणि निर्भीड असलेला हा टीझर इतिहासात खोलवर शिरतो आणि एक अशी कथा सादर करतो, जी देशभरात एका नव्या चर्चेला सुरुवात करेल. हा सिनेमा 8 मे या दिवशी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी टीझर प्रदर्शित
या सिनेमात संजय दत्तसोबत अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, नीतू चंद्रा आणि त्रिधा चौधरी यांसारखे कलाकार बघायला मिळणार आहेत. संजय दत्तची वेगळी भूमिका असलेल्या ‘आखिरी सवाल’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या सिनेमाचा टीझर कथानकाची एक प्रभावी झलक दाखवतो.
कथा नेमकी काय आहे?
आखरी सवाल सिनेमाची कथा विकी नावाच्या एका हुशार पण काहीशा तापट स्वभावाच्या तरुणाभोवती फिरते. आपला प्रबंध नाकारल्यानंतर विकी आपले मार्गदर्शक, प्राध्यापक गोपाल नाडकर्णी यांच्यावर पक्षपाताचा आरोप करतो.
सुरुवातीला एक वैयक्तिक शैक्षणिक वाद म्हणून सुरू झालेला हा प्रकार पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीपर्यंत चर्चेचा विषय बनतो. हा सिनेमा भारतातील तरुणांच्या मनातील ज्वलंत प्रश्न, त्यांच्या आशा, शंका आणि ऐतिहासिक घटना व तथ्यांच्या आधारे सत्याचा शोध घेण्याची त्यांची धडपड चित्रित करतो. त्यामुळे आखरी सवाल पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकात शिगेला पोहचली आहे.
हेही वाचा : Saktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलला; विरोधानंतर मार्ग बदलत आता साताऱ्याचा समावेश




