धक्कादायक : महिलेला पेटवून फासावर लटकविले
Updated On:

मुंबई – हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील जळीतकांडची घटना ताज्या असतानाच पनवेलमध्येदेखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला पेटवून देत फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यासंबंधित पाचही आरोपी फरार झाले असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
माहितीनुसार, शारदा माळी (५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे आहे. तर अलका पाटील, वनाबाई देवणे, गोपाळ पाटील, हनुमान पाटील अशी आरोपींची नावे आहेत.
शारदा यांनी ३ फेब्रुवारी रोजी नवीन मंगळसूत्र विकत घेतले. आणि शेजाऱ्यांना दाखविले. मात्र त्यानंतर मंगळसुत्र चोरीला गेले. याबाबत शेजाऱ्यांना विचारले असता दोन्ही कुटुंबात मोठा वाद झाला. घरात कोणी नसताना अलकासह वनाबाई, गोपाळ, हनुमान यांनी शारदा यांना बेदम मारहाण केली आणि पेटवून देत फासावर लटकविले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.





