पुणे जिल्हा | शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही

नारायणगाव, – शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही. अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट आव्हान दिलं.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सांगता सभा आज नारायणगावात पार पडली. भर पावसात या सभेला नारायणगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव, सत्यशील शेरकर आदी उपस्थित होते.
या सांगता सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट निशाणा साधत हल्ला चढवला. डॉ. कोल्हे म्हणाले की, जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरपटणार्यांच्या रांगेत जायचं नाही हे ठरवलं होतं. ‘दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नहीं’ हा आमचा बाणा आहे. ज्या भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात. असे म्हणत डॉ. कोल्हे म्हणाले की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला 12 सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे.
बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष द्या
कडेवर घेतलेल्या उमेदवाराच्या प्रचारात पालकमंत्री व्यस्त आहेत. प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष द्या. बिबट्याचा प्रश्न हा माझ्या माणसांसाठी गंभीर प्रश्न आहे, असं म्हणत बिबट्याच्या प्रश्नाकडे राज्य सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षावरुनही डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावलं.
नोटीसा पाठवल्या तरी प्रश्न विचारत राहणार
शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी संरक्षण खात्याविषयी कसे प्रश्न विचारत होते, हे डॉ. कोल्हे यांनी पुराव्यासह दाखवलं. त्यानंतर त्यांच्याकडून डॉ. कोल्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस जाहीर सभेत दाखवत,
डॉ. कोल्हे म्हणाले की, प्रश्न विचारले तेव्हा रामलिंग महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं माझा काही संबंध नाही. मराठी माणूस उद्योगपती असल्याचा अभिमान आहे. पण महाराष्ट्रात भूमिहीन शेतमजूर जो भारतात असोत त्याचा अमेरिकेत बंगला असतो याच गौडबंगाल कळलं नाही. कितीही नोटीस आल्या तरी त्याचा विचार करत नाही





