अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात; एकाचा मृत्यू 28 जण जखमी

Amravati Nagpur Highway | अमरावती -नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे अमरावती -नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नागपूर- मुबंई महामार्ग एकाबाजूने बंद करण्यात आला आहे.
अमरावती नागपूर महामार्गावर रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय बसच्यामध्ये आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ब्रेक दाबला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
सध्या या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या अपघातामुळे अमरावती-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर क्रेनच्या मदतीने शिवशाही सरळ करून महामार्ग सुरू करण्यात आला.
हेही वाचा:
इस्रायलच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या हिजबुल्लाहचे प्रत्युत्तर ; 150 पेक्षा जास्त रॉकेट डागले





