Accident: भरधाव शिवशाहीची दुचाकीला धडक; तरूणाचा जागीच मृत्यू
Updated On:

कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावर सारोळा (ता. भोर) गावच्या हद्दीत हॉटेल अमृत गार्डन समोर शिवशाही बसने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दत्तात्रय सिताराम धाडवे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
साताराच्या दिशेने जात असलेली शिवशाही बस (एमएच 04 जेके 1269) चालक अमित ज्ञानेश्वर करंजिकर (वय 30) हा भरधाव चालवत होता. त्याने दुचाकीस (एमएच 12 एलबी 6549) धडक दिल्याने अपघातात दत्तात्रय धाडवेचा जागीच मृत्यू झाला.





