Shivraj Singh Chouhan : कॉंग्रेसनेच लोकशाहीला सुरूंग लावला होता; शिवराज चौहान यांची टीका
मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेचे समर्थन करत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, मृत व्यक्तींची आणि भारतीय नागरिक नसलेल्यांची नावे मतदारयादीत राहू नयेत.

Shivraj Singh Chouhan : मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणी मोहिमेचे समर्थन करत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, मृत व्यक्तींची आणि भारतीय नागरिक नसलेल्यांची नावे मतदारयादीत राहू नयेत.
गोवा सरकारच्या वतीने फोंडा येथे आयोजित सेवा की कहानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारयादी पुनरावलोकन प्रक्रियेवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले, जर मतदारयादीत चुकीचे नाव असेल, जर एखादी व्यक्ती हयात नसेल, तर त्याचे नाव यादीत राहायला हवे का? ते काढले पाहिजे की नाही? जर कोणी भारताचा नागरिक नसेल, तर त्याचे नाव मतदारयादीत (Shivraj Singh Chouhan) असले पाहिजे का? निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एसआयआरचा मुख्य उद्देश हाच आहे की, कोणताही पात्र नागरिक मागे राहू नये आणि कोणतीही अयोग्य व्यक्ती यादीत समाविष्ट होऊ नये.
काँग्रेस पक्ष निवडणूक हरल्यावर निवडणूक आयोगाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, तर निवडणूक जिंकल्यावर तीच प्रक्रिया स्वीकारतो, असा आरोप चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केला.
तसेच १९७५ मधील आणीबाणीचा संदर्भ देत, काँग्रेसनेच लोकशाहीला सुरुंग लावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. गोवा आणि देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी गोव्यातील जनतेला केले.






