UP Congress : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ; काँग्रेसने राज्य संघटनेत केला मोठा बदल
UP Congress : उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल. आराधना मिश्रा मोना यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती, तर इमरान मसूद यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी.

UP Congress : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्य संघटनेत मोठा बदल केला आहे. आराधना मिश्रा ‘मोना’ यांची उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अजय राय यांची जागा घेतली आहे. इमरान मसूद यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.
याशिवाय आलोक प्रसाद आणि देवेंद्र निषाद यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चौधरी वीरेंद्र सिंह यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
The Congress has appointed Aradhana Misra Mona as the Uttar Pradesh Congress Committee president, Imran Masood as working president, and Devinder Nishad and Alok Prasad as senior vice presidents, with immediate effect. The party also approved the appointment of Chaudhary Virendra Singh as the Leader of the Congress Legislature Party in Uttar Pradesh.
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2026
कोण आहेत आराधना मिश्रा?
आराधना मिश्रा या प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर खास मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्या या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्या उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या होत्या. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्या कन्या आहेत.
अजय राय यांच्याकडे ऑगस्ट 2023 पासून प्रदेशाध्यक्षपद होते. आता त्यांच्या जागी आराधना मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 साठी अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले, तरी निवडणूक फेब्रुवारी-मार्च 2027 दरम्यान होण्याची शक्यता आहे.




