Shivpal Yadav – समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांचा जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. यावेळी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आपले नशीब आजमावत आहे. आपल्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी पक्षाचे 20 स्टार प्रचारक निवडणुकीच्या मैदानात उतरणारआहेत. मात्र, या यादीतून पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यांचे नाव गायब आहे. यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात सपाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात मात्र शिवपाल यादव यांचे नाव आहे. मात्र, हरियाणा निवडणुकीत सपाने उमेदवार दिलेला नाही. अशा परिस्थितीत सपाने इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ते सपा उमेदवारांसाठी मते मागतील. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, सात खासदार, दोन राष्ट्रीय सचिव आणि एका आमदाराचाही या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तथापि, शिवपाल यांचेच नाव गायब असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष किरणमय नंदा, खासदार अवधेश प्रसाद, खासदार धर्मेंद्र यादव, राज्यसभा खासदार जावेद अली, खासदार हरेंद्र मलिक, खासदार इकरा हसन, खासदार प्रिया सरोज, खासदार पुष्पेंद्र सरोज, आमदार कमल अख्तर, विधान परिषद सदस्य जसमिर अन्सारी, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. उदयवीर सिंग, राष्ट्रीय सचिव राम आसरे विश्वकर्मा आणि अकील मुर्तझा, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य फारुख शीर, जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष जियालाल वर्मा, जम्मू-काश्मीरचे महासचिव फैयाज अहमद भट्ट, जम्मू-काश्मीर राज्य कोषाध्यक्ष विजय अबरोल. आणि जम्मू-काश्मीर समाजवादी पार्टीचे नेते मोहम्मद आझम यांच्या नावांचा यादीत समावेश आहे.