Shivendrasinhraje Bhosale: “देशप्रेम द्विगुणित होईल…”, ‘हर घर तिरंगा’ अभियानावर शिवेंद्रसिंहराजे काय म्हणाले?
Shivendrasinhraje Bhosale: 'हर घर तिरंगा' अभियानामुळे देशावरील प्रेम अधिक वृद्धिंगत होईल; साताऱ्यातील मोती चौकात भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजवाटप सोहळा संपन्न.

Shivendrasinhraje Bhosale – आपल्या देशावर असलेले आपले प्रेम अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवून या अभियानात सहभाग घ्यावा. या अभियानामुळे देशप्रेम वृद्धिंगत होईल, असा विश्वास ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार हर घर तिरंगा या अभियानांतर्गत सातारा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरावर लावण्यासाठी तिरंगा ध्वज उपलब्ध करून दिले असून ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सातारा शहरातील मोती चौक येथे नागरिकांना प्रतिनिधिक स्वरूपात 1000 तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष अॅड. दत्तात्रय बनकर, भाजप सातारा विधानसभेचे प्रमुख अविनाश कदम, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, भाजप जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, वैशाली टंगसाळे, अविनाश खर्शीकर, मारुती चिकणे, भाजप पदाधिकारी, सातारा पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, सातारा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्यासह नागरिक े उपस्थित होते.





