Tuljapur Rest House : तुळजापूर विश्रामगृहाच्या कामाला गती द्या: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
तुळजापूर येथील नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या (Tuljapur Rest House) बांधकामाला गती देऊन ते आधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले.

Tuljapur Rest House : तुळजापूर येथील नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या (Tuljapur Rest House) बांधकामाला गती देऊन ते आधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले.
राज्यातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या (Tuljapur Rest House) संख्येने येणारे भाविक, मान्यवर तसेच शासकीय अधिकारी यांच्या निवासाची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित नवीन विश्रामगृहाचे बांधकाम दर्जेदार आणि आधुनिक पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रस्तावित नवीन विश्रामगृहाच्या जी+2 इमारतीचे एकूण बांधकाम सुमारे ३ हजार ३६६ चौ.मी. क्षेत्रफळाचे आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर निवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पाचा अंदाज तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहे.
विश्रामगृहाच्या बांधकामामध्ये गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. तुळजापूरचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन प्रस्तावित विश्रामगृह हे आधुनिक सुविधांनी युक्त, सुरक्षित, आकर्षक आणि दर्जेदार असावे, यावर बैठकीत विशेष भर दिला. विश्रामगृहामध्ये सौर पॅनलची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच संपूर्ण इमारतीसाठी केंद्रीकृत वातानुकूलित प्रणाली बसविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तुळजापूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान (Tuljapur Rest House) आहे. येथे येणाऱ्या भाविक, मान्यवर आणि शासकीय अधिकारी यांच्यासाठी निवासाची सुविधा अत्याधुनिक आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी आणि बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोरपणे तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.






