शिवभोजन योजनेचा ११ हजार ४१७ लोकांनी घेतला लाभ
Updated On:

मुंबई : शिवसेनेच्या बहुचर्चित शिवभोजन योजनेचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुभारंभ करण्यात आला. शिवभोजन योजनेचा एकाच दिवशी राज्यातील ११ हजार ४१७ लोकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे करण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.





