IND vs AUS : शिवम दुबेचा कहर! झाम्पाला ठोकला गगनचुंबी षटकार, चेंडू पोहोचला थेट स्टेडियमबाहेर, पाहा VIDEO

Shivam Dube hit 106m six out of stadium : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँड येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान या सामन्यात शिवम दुबेने आपल्या एका षटकारांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेने अॅडम झाम्पाच्या चेंडूवर अफलातून षटकार ठोकला. हा षटकार इतका उत्तुंग होता की चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. परिणामी अंपायरांना नवीन चेंडू मागवावा लागला. त्यामुळे नवीन येऊपर्यंत खेळ काही मिनिटांसाठी थांबला. या षटकाराची अधिकृत लांबी १०६ मीटर नोंदवली गेली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वापरल्या जाणाऱ्या चेंडूची किंमत सुमारे २५ हजार रुपये असल्याने आर्थिक नुकसानही सहन झाले.
शिवम दुबेच्या गगनचुंबी षटकाराने वेधलं लक्ष –
New ball please! Shivam Dube sent that one way out of the stadium 👀#AUSvIND pic.twitter.com/H5px77NuIa
— cricket.com.au (@cricketcomau) November 6, 2025
भारतीय फलंदाज ठरले अपयशी –
क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या शिवम दुबेला मोठी संधी मिळाली, मात्र तो फक्त १८ चेंडूंमध्ये २२ धावा करून बाद झाला. त्याचा स्ट्राइक रेट १२२.२२ राहिला. नॅथन एलिसने त्याला बोल्ड केले. तरीही दुबेचा हा षटकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिषेक शर्माने २१ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने १० चेंडूंमध्ये २० धावा करून धक्कादायक पद्धतीने बाद झाला.
हेही वाचा – Player of the Month : ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकन जाहीर! भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला मिळालं स्थान
झाम्पा-एलिसने केली घातक गोलंदाजी –
उपकर्णधार शुबमन गिलने चांगली सुरुवात केली, पण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर ४६ धावांवर (स्ट्राइक रेट ११७.९५) बाद झाला. तिलक वर्माने केवळ ५, जितेश शर्माने ३, तर वॉशिंगटन सुंदरने १२ धावा केल्या. भारताने सलग ४ विकेट्स फक्त १४ धावांवर गमावल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झाम्पाने ४५ धावा देत ३ विकेट घेतल्या, तर नॅथन एलिसने ४ षटकांत २१ धावा देत गिल, दुबे आणि सुंदर अशा ३ महत्त्वाच्या विकेट घेतल्या.





