राजकीय सभांचा धडाका ! ‘शिवाजी पार्क’ मैदानासाठी 4 पक्षांमध्ये रस्सीखेच ; सर्व पक्षाकडून अर्ज दाखल

Shivaji Park’meeting । राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे मतदान एकाच टप्प्यात होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षाकडून आहे. राज्यात आता विविध ठिकाणी राजकीय सभांचा धडाका पाहायला मिळेल. याचपार्श्वभूमीवर दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क मैदानासाठी चार पक्षांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.
एकाच मैदानासाठी 4 पक्षांमध्ये रस्सीखेच Shivaji Park’meeting ।
विधानसभा निवडणूकीसाठी छत्रपती शिवाजी मैदासाठी 4 पक्षांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यात मैदान मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु झालीय. 17 नोव्हेंबरसाठी या चारही पक्षांनी अर्ज केला आहे. 18 नोव्हेंबरला प्रचार थंडावतात, त्यामुळे 17 तारखेला या मैदानासाठी चढाओढ सुरु आहे. शिवसेना उबाठा, भाजप, शिवसेना शिंदेगट, आणि मनसेकडून अर्ज करण्यात आला आहे. मात्र अर्ज पहिल्यांदा मनसेकडून आला असल्याने मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
भाजपकडून मुंबईतील ‘ या’ 5 आमदारांचा पत्ता कट ? Shivaji Park’meeting ।
भाजपकडून मुंबईत राम कदम यांच्यासह पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भाजपच्या जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना उमेदवारी मिळू शकते. तर घाटकोपरमध्ये राम कदम यांचा पत्ता कट झाल्यास महायुतीचा चेहरा कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना संधी मिळू शकते. घाटकोपर पूर्व मतदारसंघात पराग शहा यांच्याऐवजी प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर बोरिवली मतदारसंघात सुनील राणे यांच्याऐवजी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.





