“नारायण राणेंनी माझे खच्चीकरण केलं” ; राजन तेलींचे गंभीर आरोप, ठाकरे गटाकडून सावंतवाडीतून राणेंच्या विरोधात मैदानात उतरणार ?

Rajan Teli on Narayan Rane । राज्यातील विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्याच्या २० तारखेला होणार असून २३ तारखेला राजयात कोणाची सत्ता येणार हे ठरणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात म्हणावे यश मिळवता आले नाही. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने आता कोकणातील भाजपच्या नेत्याचा पक्षप्रवेश करून घेत मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार राजन तेली हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा भाजप आणि राणेंसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे.
नारायण राणे यांच्याकडून भाजपमध्ये आपले खच्चीकरण Rajan Teli on Narayan Rane ।
राजन तेली यांनी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा कालच राजीनामा दिला. यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नारायण राणे यांच्याकडून भाजपमध्ये आपले खच्चीकरण केल्याचा गंभीर आरोप यावेळी तेली यांनी केला. राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत होईल, असे मानले जात आहे.
राजन तेली यांची एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान राणे कुटुंबीय आणि राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. याठिकाणी राजन तेली यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले होते. नितेश राणे यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असे राजन तेली यांनी म्हटले होते. यानंतर राजन तेली यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी वातावरण प्रचंड तापले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर राजन तेली यांच्या घरावर दगडफेक झाली होती.
दीपक केसरकरांसमोर आव्हान? Rajan Teli on Narayan Rane ।
राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर आणि राजन तेली हे कट्टर वैरी मानले जातात. हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा, यासाठी राजन तेली आग्रही होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने त्यांची मागणी गांभीर्याने न घेतल्याने राजन तेली आता ठाकरे गटात जाणार आहेत.
दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने मोट बांधली आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनीही दीपक केसरकरांना लक्ष केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत केसरकर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले असल्याचे म्हटले जात आहे.





