Shivaji Maharaj Statue Collapsed: छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा….

Shivaji Maharaj Statue Collapsed । सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्यावर किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यापुतळा सोमवारी दुपारी कोसला. उभा दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट कोसळली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधला जात आहे.
या घटनेनंतर आता पोलिसांनी पहिली कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदार जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडी पक्षाकडून यावर दुर्देवी घटनेवरून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. हा पुतळा कोसळल्याची बातमी समोर आल्यानंतर राणे कुटुंबाकडून काय प्रतिक्रिया येते याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होती.
मात्र, आता राणे कुटूंबियांनी यावर भाष्य केलं आहे. स्थानिकमाध्यमांशी बोलताना निलेश राणेंनी म्हटलं आहे. “जे घडलं आहे ते फार दूर्भाग्यपूर्ण आहे. असं व्हायला नको होतं. ज्याची चूक असेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. कंत्राटदार असो किंवा अधिकारी असो त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आम्ही याचा पाठपुरावाही करु. आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत. दोषींवर कठोर कारवाई नक्की केली जाईल,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना निलेश राणेंनी, “हा पुतळा पुन्हा या ठिकाणी उभा करण्यासाठी जे काही करावं लागेल ते तातडीने केलं जाईल, हे आश्वासन मी तुम्हाला देतो,” असंही म्हटलं आहे. या स्मारकाला दुर्घटनेनंतर भेट दिल्याचे फोटोही निलेश राणेंनी पोस्ट केले आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकार मधील जेष्ट मंत्री मा. श्री. दीपक केसरकर यांच्याशी आज चर्चा झाली. गंभीर्यता लक्षात घेता लवकरात लवकर या भव्यदिव स्मारकाच्या उभारणीसाठी सरकार युद्धपातळीवर काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि एक जॉइंट बैठक लावणार असल्याचं ही त्यांनी कळवले. छत्रपती शिवाजी…
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 27, 2024
“मालवण किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत वाईट घटना काल घडली. आज या पार्श्वभूमीवर किल्ले राजकोट येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई सोबतच त्याच ठिकाणी पुन्हा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहणार,” असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
मालवण किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत वाईट घटना काल घडली. आज या पार्श्वभूमीवर किल्ले राजकोट येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई सोबतच त्याच ठिकाणी पुन्हा भव्य दिव्य पुतळा लवकरात… pic.twitter.com/CYFoMDHw2K
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 27, 2024
महाराष्ट्र राज्य सरकार मधील जेष्ट मंत्रीदीपक केसरकर यांच्याशी आज चर्चा झाली. गंभीर्यता लक्षात घेता लवकरात लवकर या भव्यदिव स्मारकाच्या उभारणीसाठी सरकार युद्धपातळीवर काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि एक जॉइंट बैठक लावणार असल्याचं ही त्यांनी कळवले. छत्रपती शिवाजी महाराजांच किल्ले राजकोट येथील स्मारक हे पूर्वीपेक्षाही भव्यदिव आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असेल. असं देखील ते म्हणाले.





