Shivaji Maharaj Statue Collapsed: ‘पुतळ्याचे नट-बोल्ट गंजले होते, सहा दिवस आधीच सांगितलं’; अधिकारी नेमकं काय म्हणाले पाहा….

Shivaji Maharaj Statue Collapsed – सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या एका मोठ्या अपडेटमध्ये असे समोर आले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) स्थानिक युनिटने 20 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नट आणि बोल्ट पडण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. महाराजांच्या पुतळ्याला गंज चढत होता.
नुकत्याच झालेल्या पुतळ्याच्या दुरुस्तीच्या वेळी नट आणि बोल्ट वापरण्यात आले होते आणि पावसामुळे ते गंजत असल्याचेही कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे. पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील पुतळ्याच्या स्थितीवर प्रकाश टाकला होता, असे पीडब्ल्यूडी दस्तऐवजात नमूद केले आहे. दुरुस्तीचे काम करणारे शिल्पकार जयदीप आपटे यांना तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यात म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने दिलेल्या माहितीवरून अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसता. यामुळे महायुती सरकार आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला मोठा पेच निर्माण झाला आहे.
मालवणमध्ये विराट मोर्चा
या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या शासन प्रसासनाच्या या भ्रष्टकारभाराचा निषेध करण्यासाठी मालवणात विराट जनसंताप मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक शिवप्रेमीं नागरिकांच्या मनात उफाळलेला तिव्र संताप शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि या दुर्घटनेमागच्या सर्व सूत्रधारांना कायमची अद्दल घडविण्यासाठी उद्या बुधवार 28 ॲागष्ट रोजी सकाळी 10 वाजता मालवण भरड दत्तमंदिर येथून बाजारपेठ मार्गे तहसिलदार कार्यालयावर हा जनसंताप मोर्चा काढला जाणार आहे.
शिवप्रेमींना केले आवाहन
या विराट जनसंताप निषेध मोर्चात तमाम शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शाखा मालवण- महाविकास आघाडी व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश
सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. तसेच 20 ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आलं होतं. पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा, असा कयास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तर पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.





