शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’ मधून पडणार बाहेर? ‘या’ शो मध्ये करणार दमदार एंट्री

मुंबई – ‘बिग बॉस 16’ फेम शिव ठाकरे आता ‘खतरों के खिलाडी सीझन 13’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यातही उत्तम कामगिरी करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता शिव या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण तो लवकरच एका नव्या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
शिव ‘एमटीव्ही रुडीज’मध्येही दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. ‘एमटीव्ही रुडीज’चा 19वा सीझन सुरू झाला असून यात आता शिव देखील दिसणार आहे. ‘कर्म या कांड’ या थीमवर आधारित हा नवीन सीझन आहे. यात रिया चक्रवर्ती, गौतम गुलाटी आणि प्रिन्स नरुला यांची गँग पाहायला मिळणार आहे.
यानंतर आता शिव देखील या गँगमध्ये सामील होणार आहे. नुकतेच एमटीव्ही रोडीजच्या गॅंग लीडर्सचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शिव देखील दिसत असल्याने ही चर्चा सुरू झाली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये “खूप प्रतिक्षा करत होता ना, आता शिव आला आहे,” असे लिहिले आहे.
सध्या एमटीव्ही रोडीज 19 च्या ऑडिशन्स वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहेत. विशेष म्हणजे शिव ठाकरेची सुरूवात रोडीज मधूनच झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्याला नव्या रुपात पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. हा शो दर शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता MTV आणि Jio Cinema वर पाहता येणार आहे.





