Bigg Boss 16 | ‘बिग बॉस 16’ फेम अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर चौधरी जोडी चर्चेत होती. या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बिग बॉसच्या घरात येण्याआधी ‘उडारियाँ’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. या दोघांनी कधी स्पष्ट कबुली दिली नसली तरी ते एकमेकांना डेट करत असल्याची खात्री चाहत्यांना होती. बिग बॉस 16 मधील सहभाग घेतल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यात रोमँटिक केमिस्ट्री पाहिली. मात्र दोघांचेही ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अंकित आणि प्रियांकाने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. प्रियांका आणि अंकितने जरी एकमेकांना अनफॉलो केलं असलं तरी त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तसेच ठेवले आहेत. गेल्या वर्षी या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र प्रियांकाने या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं होतं. “आम्ही दोघं फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहोत. लग्नाच्या चर्चा कुठून पसरवल्या जात आहे, मला माहीत नाही”, असं ती म्हणाली होती. शिवाय मीडिया रिपोर्टनुसार असेही समोर आले आहे की, ते ज्या घरात एकत्र राहायचे ते घरही प्रियांकाने सोडले आहे. हे. प्रियांका आणि अंकितने जरी एकमेकांना अनफॉलो केलं असलं तरी त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तसेच ठेवले आहेत. Bigg Boss 16| प्रियांका आणि अंकित यांच्या डेटिंगच्या बातम्या ‘बिग बॉस 16’ या रिअॅलिटी शोमध्ये असताना समोर आल्या होत्या. त्यांनी याविषयी कधीच अधिकृत माहिती दिली नव्हती. सोशल मीडियावर देखील दोघे सक्रिय असायचे. दोघांचे अनेक फोटो त्यांनी इनस्टा ग्रामवर शेअर केले होते. या मुद्द्यावर दोघांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. Bigg Boss 16| हेही वाचा: किंग खान नेगेटीव्ह व्यक्तीरेखेत; पुष्पाच्या दिग्दर्शकासोबत नवा प्रोजेक्ट? सोशल मीडियावर काय चर्चा सुरुऐ…