Pune District : वारकऱ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार

पौड : मुळशी तालुका दिंडी क्रमांक 96 च्या वतीने वारकरी बांधवांना तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामासाठी घेण्यात येणार्या चार गुंठे जागेसाठी शिवसेना कोळवण विभाग, अविनाश बलकवडे व संतोष आधवडे यांच्या सौजन्यातून आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे वारकरी बांधवांच्या मुक्काम व्यवस्थेची उभारणी अधिक सुलभ होणार आहे.
अविनाश बलकवडे म्हणाले, वारकरी परंपरा ही आपल्या संस्कृतीची पवित्र ओळख असून समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. वारकरी म्हणजे केवळ नामस्मरण करणारा नाही, तर तो प्रबोधन, समता आणि सेवा यांचा दीपस्तंभ आहे. त्यामुळे वारकर्यांची सेवा म्हणजे समाजसेवेचं कार्य. त्यांच्या सोयीसाठी तरडगाव (ता. फलटण) येथे उभारण्यात येणार्या मुक्काम स्थळाला आम्ही समाजभावनेतून छोटासा हातभार लावला आहे.
पौड येथे झालेल्या कार्यक्रमात ह. भ. प. यशवंत फाले, दशरथ मानकर, अंकुश साठे, दशरथ वहाळे, मारुती तोंडे, मोहन साठे, नरहरी हगवणे, दत्तात्रय भेगडे, चंद्रकांत लोयरे, दत्ता भेगडे, दिनकर जोरी, बबन शिंदे, सुभाष टेमघरे, नारायण साठे, लहू साठे यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी युवासेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश नानासाहेब बलकवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, ज्येष्ठ शिवसैनिक नामदेव टेमघरे, नारायण धिडे, संजय ढमाले, धर्मा फाले, रोहिदास दुर्गे, माऊली धिडे, युवासेना तालुकाधिकारी दत्ता झोरे, शिव आरोग्य सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, उपतालुका प्रमुख संतोष अधवडे व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.





