बदलापूरप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

कोरेगाव – बदलापूरमधील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. दिवसेंदिवस विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. कोरेगाव शहरातील मुख्य आझाद चौकात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केले.
यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीला तात्काळ जाहीरपणे भर चौकात फाशी देण्याची मागणी तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे यांनी केली आहे.
तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलावडे सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे युवा सेना तालुकाप्रमुख धैर्यशील शिर्के महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उज्वला भोसले, खवळे यांच्यासह संभाजी वाघमोडे, दत्तात्रय संकपाळ, बबनभाऊ फाळके, युवासेना कोरेगाव शहर प्रमुख अनिकेत बर्गे, हर्षल जोशी, मनोज नलावडे, समीर साळुंखे, अभिजीत कदम, रमेश काकडे, शिवाजी पवार, अमन महाडिक, सदाशिव माने, अंकीत चव्हाण, रोहीदास काळे, सतीश अडागळे, प्रतिक साळुंखे, आशिष शिंदे, रोहीत गिरी, आदेश कदम, तेजस शिर्के, ओमकार झांजुर्णे यांनी आझाद चौकात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी तहसीलदार कार्यालकडे आपला मोर्चा वळवला. तेथे घोषणाबाजी करत बदलापूरप्रकरणी राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत आणि दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, त्यांना फाशी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले.





