Satara News : महाबळेश्वर बस स्थानकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आंदोलन

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने नुकत्याच प्रवासी करात १५% दर वाढ केली असून ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. या कारणास्तव शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातारा उपजिल्हाप्रमुख श्री.अजित यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत, तालुका प्रमुख श्री. संतोष (आप्पा) जाधव,शहरप्रमुख श्री.राजाभाऊ गुजर,महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे यांच्या नेतृत्वाखाली येथील बसस्थानकामध्ये रास्ता रोको आंदोलन करत या निर्णय बाबत निषेध व्यक्त केला.
याच बरोबर येथील अधिकाऱ्यांना निवेदन देत जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळी एस टी बसेसची दुरवस्था झाली असून येथील स्थानिकांना तसेच पर्यटकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असून असे निर्णय घेण्यात आधी बसेस सुधारणा करणे व आधी नियमित सेवा पुरवावी त्याच बरोबर १५% दर वाढीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
या वेळी सातारा जिल्हा प्रसिद्धी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पांचाळ,आरोग्य सेना शहरप्रमुख अमोल साळुंखे,महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.सुजाता मोरे, उपतालुकाप्रमुख सौ.पौर्णिमा मोहिते,शहरप्रमुख सौ.वसुधा बगाडे,प्रशांत मोरे,उपशहरप्रमुख राजू साळवी, जितेश कुंभारदरे असिफ महापूळे, अल्ली वारूणकर, अतुल पारवे, दीपक ताथवडेकर ,समीर तांबोळी, आबा पारठे,शाहनवाज खारकंडे, अंकुश ऊलालकर,वैभव शिंदे,ऋषिकेश यादव,अशोक शिंदे,एकनाथ मोरे प्रशांत भोसले आदी शिवसैनिक स्थानिक नागरिक उपस्थित होते.





