Shiv Sena Symbol : शिवसेना कोणाची? उद्यापासून अंतिम सुनावणीला सुरुवात, मोठ्या घडामोडी घडणार?
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर १२ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर उद्या, गुरुवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेशी संबंधित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत चाळीसाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह नेमके कोणाच्या ताब्यात राहणार, याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सध्या हा वाद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्या ठाकरे गटामध्ये सुरू आहे.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीत या प्रकरणावर नेमकी कोणती भूमिका स्पष्ट होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

