शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना करा – उदयनराजे भोसले
Updated On:

पुणे : शिवसेना पक्षाला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारले होते का? असा प्रश्न भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेनेने नाव बदलून ठाकरे सेना करावे, असेही उदयनराजेंनी सांगितले आहे.
दरम्यान, ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.





