Eknath Shinde : एकनाथ शिंदेंमुळे भाजप सत्तेत; शिवसेना आमदाराच्या वक्तव्याने महायुतीत पुन्हा चर्चा
Eknath Shinde : महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील घटक पक्षांमधील अंतर्गत राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Eknath Shinde : महायुतीमधील अंतर्गत राजकीय मतभेदांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेना (शिंदे गट)चे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारमध्ये पत्रकारांशी बोलताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळेच भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येण्याची संधी मिळाली, असा दावा रघुवंशी यांनी केला. (Eknath Shinde)
रघुवंशी म्हणाले की, महायुती सरकार हे तीन पक्षांचे सरकार असून तिन्ही पक्ष सत्तेतील दावेदार आहेत. “भारतीय जनता पक्षाला जिवंत एकनाथ शिंदेंनी करून दिलं, नाहीतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्वच राहिलं नव्हतं,” असे वक्तव्य त्यांनी केले. महाविकास आघाडीच्या काळात भाजप सत्तेत नव्हता आणि एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतरच भाजपला राज्यात सत्तेत येण्याची संधी मिळाली, असा दावा त्यांनी केला. (Eknath Shinde)
विजयकुमार गावितांवरही निशाणा
चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याबाबतही भाष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर गावित यांना मंत्रीपद मिळाल्याचा संदर्भ देत, “गावीत साहेबांची लॉटरी लागली,” असे रघुवंशी म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गावित अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री होते. (Eknath Shinde)
रघुवंशी यांच्या या वक्तव्यामुळे नंदुरबारमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील स्थानिक राजकीय मतभेदांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महायुतीतील दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी असून, यापूर्वीही चंद्रकांत रघुवंशी यांची वक्तव्ये राजकीय चर्चेचा विषय ठरली आहेत. (Eknath Shinde)
Eknath Shinde : पराभवानंतरच निवडणूक आयोग, ईव्हीएमवर टीका; एकनाथ शिंदे यांचा विरोधकावर निशाणा
Eknath Shinde: “देशाच्या जनतेची माफी मागावी”; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल






