Eknath Shinde: “देशाच्या जनतेची माफी मागावी”; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Eknath Shinde: निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांचे संयुक्त निवेदन जारी

Eknath Shinde: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आयोगात मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप होत आहे. दोन निवडणूक आयुक्तांनीच आरोप केल्याने केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाची चर्चा सर्वत्र सुरू झाली.
यानंतर ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. परंतु काल तिन्ही निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीत एसआयआर बाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगात सर्वकाही सुरळीत सुरू असल्याची चर्चा झाली. (Eknath Shinde)
निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी संयुक्त निवेदन जारी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या संयुक्त निवेदनानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी. इंडिया आघाडीचं राजकारण हे फक्त ‘फेक नॅरेटिव्ह’वरच टिकू शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचा हल्लाबोल शिंदे यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? (Eknath Shinde)
“राहुल गांधी यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी. इंडिया आघाडीचं राजकारण हे फक्त ‘फेक नॅरेटिव्ह’वरच टिकू शकतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याच्या खोट्या व निराधार बातम्या पसरवून इंडिया आघाडीचे नेते उर बडवत आनंदोत्सव साजरा करत होते,” असे एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हंटले.
राहुल गांधी यांनी देशाच्या जनतेची माफी मागावी…
इंडी’ आघाडीचे राजकारण हे फक्त ‘फेक नॅरेटिव्ह’वरच टिकू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे!
निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याच्या खोट्या व निराधार बातम्या पसरवून ‘इंडी’ आघाडीचे नेते उर बडवत आनंदोत्सव साजरा करत होते. परंतु तिन्ही… https://t.co/ODXskhKldr
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 26, 2026
“मात्र, तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या ‘संयुक्त निवेदना’ने त्यांच्या या फुग्यातली हवा पूर्णपणे काढून टाकली आहे. याच खोट्या मुद्द्याचा आधार घेऊन विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बदनाम करण्याचा व त्यांच्यावर पातळी सोडून टीका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अशा पद्धतीने बदनामीचे राजकारण करणाऱ्या राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी देशाच्या जनतेकडे त्वरित माफी मागितली पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
‘जनतेत संभ्रम पसरवणं हाच या इंडिया आघाडीचा मूळ स्वभाव’ (Eknath Shinde)
“संवैधानिक संस्थांना सतत बदनाम करणं, लोकशाही प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं आणि जनतेत संभ्रम पसरवणं हाच या इंडिया आघाडीचा मूळ स्वभाव आहे. देशाची जागरूक जनता हा घृणास्पद खेळ चांगल्या प्रकारे ओळखून आहे आणि योग्य वेळी यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. देशाची १४० कोटी जनता मोदी आणि अमित शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या खोट्या आरोपांमुळे तसूभरही फरक पडत नाही,” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:





