मांजरवाडी : “महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन विजयी करतील.” असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी व्यक्त केला.
मांजरवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत माऊली खंडागळे बोलत होते. यावेळी खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव व मांजरवाडी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शरद लेंडे, उद्योजक डी.आर.थोरात, उपसरपंच संतोष मोरे यांची भाषणे झाली. सरपंच सारिका गायकवाड यांनी आभार मानले.
सत्यशील शेरकर म्हणाले की , “विकासाच्या बाबतीत जुन्नर तालुक्याला वेगळ्या उंचीवर न्यायचे असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य या गरजांवर प्रामुख्याने काम करायचे आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, शेतीमालासाठी उद्योग प्रक्रिया प्रकल्प तयार करणे, तालुक्यातील बिबट्याचा प्रश्न सोडविणे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा मानस आहे.”
सत्यशील शेरकर पुढे म्हणाले कि , शरद पवार यांचा पक्ष फोडला , उद्धव ठाकरे यांचाहि पक्ष फोडला . त्यावेळी दोन्ही पक्षाचे कट्टर कार्यकर्ते कुठेही गेले नाहीत. त्यांनी पक्ष नेतृत्वाला साथ दिली. शिवसेना पक्ष फुटला त्यावेळी माऊली खंडागळे सारखा कट्टर व निष्ठवान शिवसैनिक पक्षातच राहिला . सर्वत्र पक्षाची वाताहत होत असताना जुन्नर मध्ये त्यांनी पक्ष मजबूत केला.माऊली खंडागळे व त्यांचे शिवसैनिक हे महाविकास आघाडीचे काम मनापासून करीत आहेत , पुढील काळात माऊली खंडागळे यांचा योग्य सन्मान राहील असा शब्द सत्यशील शेरकर यांनी यावेळी दिला.
शरद लेंडे म्हणाले कि, शरद पवार यांच्या माध्यमातून जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. शरद पवार यांनी दिलेले उमेदवार सत्यशिल शेरकर हे तरुण तडफदार, होतकरू आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले व्यक्तिमत्व आहे , महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम सुरु केल्याने सत्यशील शेरकर हे मोठ्या मतांनी विजयी होतील , असा विश्वास शरद लेंडे यांनी व्यक्त केला.