Shirwal Accident: लोणंद-शिरवळ मार्गावर भीषण अपघात; बुलेटच्या धडकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
लोणंद – लोणंद-शिरवळ मार्गावरील शेडगेवाडी फाटा (ता. खंडाळा) येथे भरधाव वेगात आलेल्या बुलेट दुचाकीने दुसर्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार दि. 3 रोजी दुपारी घडला.याबाबत अधिक माहिती अशी, वाठार बुद्रुक, ता. खंडाळा येथील चंद्रकांत सखाराम भोसले (वय 55) दुचाकीवरून (क्र. एमएच-11-झेड-845) घेऊन शेतातून घरी जात असताना,
लोणंद-शिरवळ रस्त्यावर शेडगेवाडी फाटा येथे मागून येणार्या बुलेट दुचाकी (क्र. एमएच-42-बीआर-5545) वरील अनोळखी चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात भोसले यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.अपघातात चंद्रकांत भोसले गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित दुचाकी चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी सचिन अण्णा भोसले (वय 40, रा. वाठार बुद्रुक) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास स. पो. फौजदार भिसे करीत असून, फरार दुचाकी चालकाचा शोध सुरू आहे.



