शिरूर: विनयभंग प्रकरणातील पिडीतेला जिवे मारण्याची धमकी
Updated On:

निमोणे – करडे (ता. शिरुर) येथे रेशन दुकानात गेलेल्या २८ वर्षीय अल्पसंख्याक महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. पीडितेने शिरुर पोलिस ठाण्यात रेशन दुकानदाराविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर गावातील काही राजकीय मंडळींकडून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे.
तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने काल (१५ जुलै) आरोपीच्या मुलाने तर आज (१६ जुलै) गावातील स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ गुंडाने शिरुर बायपासवर पीडितेला गाडी आडवी लावून पुन्हा जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, शिरुर पोलिस ठाण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, गुन्हेगार खुलेआम वावरत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
टॅग्स:





